अंगावर संपूर्ण रेल्वे गेल्यावरही तो राहिला जिवंत

 उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरून संपूर्ण रेल्वे गेली तरी तो जिवंत आहे.

Updated: Feb 2, 2016, 04:04 PM IST
अंगावर संपूर्ण रेल्वे गेल्यावरही तो राहिला जिवंत  title=

मथुरा :  उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरून संपूर्ण रेल्वे गेली तरी तो जिवंत आहे.

मथुरा रेल्वे स्टेशनवर ही घटना ३० जानेवारी रोजी घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास युवा एक्स्प्रेसमध्ये आपल्या कुटुंबियांना सोडण्यासाठी हा व्यक्ती आला होता.

आपल्या कुटुंबियांना गाडीत बसविल्यानंतर तो उतरायला लागला. तेव्हा त्याचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधील भागात पडला. 

पण सुदैवाने हा ३० वर्षीय युवक वाचला. त्याला कोणतीही जखम झाली नाही. पण तो खूप घाबरला होता.

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ