मोदींच्या योजनेसाठी माता अमृतानंदमयीने दिले १०० कोटी रूपये

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगा स्वच्छता या महत्वाकांक्षी प्रकल्प 'नमामि गंगे' साठी धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांनी पुढाकार घेतला असून १०० कोटी रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. 

Updated: Sep 11, 2015, 02:34 PM IST
मोदींच्या योजनेसाठी माता अमृतानंदमयीने दिले १०० कोटी रूपये title=

चेन्नई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगा स्वच्छता या महत्वाकांक्षी प्रकल्प 'नमामि गंगे' साठी धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांनी पुढाकार घेतला असून १०० कोटी रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. 

अनुयायांमध्ये 'अम्मा' म्हणून लोकप्रिय असलेल्या अमृतानंदमयी यांनी यावर्षी मार्चमध्ये मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत 'नमामि गंगे' संदर्भात बोलणे झाले होते. त्यावेळी त्या या प्रकल्पासाठी मदत करू शकतात असे म्हटले जात होते. 

तामिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी 'अम्मा' यांच्या स्वच्छ भारत अभियानात सहयोग करण्याची प्रशंसा केली होती. येत्या ११ सप्टेंबर रोजी केरळच्या अमृतपुरी आश्रमातील कार्यक्रमात अर्थमंत्री अरूण जेटली यांना १०० कोटी रुपयांचा चेक देणार आहे. या पैशांचा वापर गंगेकाठच्या मागास गावात शौचालय निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.