मोदी सरकारचं जवानांना दिवाळी गिफ्ट

सरकारने जवानांना दिवाळीचं एक गिफ्ट दिलं आहे. लष्कर प्रमुख आणि सरकार जवानांसाठी ग्रेट पे देणार आहे. त्यावरुन सुरु असलेला वाद संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Updated: Oct 13, 2016, 12:18 PM IST
मोदी सरकारचं जवानांना दिवाळी गिफ्ट title=

नवी दिल्ली : सरकारने जवानांना दिवाळीचं एक गिफ्ट दिलं आहे. लष्कर प्रमुख आणि सरकार जवानांसाठी ग्रेट पे देणार आहे. त्यावरुन सुरु असलेला वाद संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालय मनोहर पर्रिकर यांच्या आदेशानुसार पे कमीशनचं नोटिफिकेशन पेंडिंग असल्याने राष्ट्रपतींनी अस्थायी रुपात ग्रेड पे देण्यासाठी मंजुरी दिली आहे.

जवानांना मिळणाऱ्या पगाराच्या 10 टक्के हा ग्रेड पे दिला जाणार आहे. जानेवारी 2016 पासूनचा ग्रेड पे जवानांना दिला जाणार आहे. सगळ्या प्रकारच्या जवानांना बोनसच्या रुपात एका महिन्याचा पगार दिला जाणार आहे.

जवानांना ही रक्कम दिवळीच्या आधी दिली जाणार आहे. जवानांना पे कमीशन अजून लागू नाही झालेलं. तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या हस्तक्षेपामुळे कमीशनचं कॉप्मनसेशन स्ट्रक्चर काय असावं याला उशीर झाला. 

सेना प्रमुखांनी म्हटलं की, जोपर्यंत डिसेबिलिटी पे आणि पेंशनच्या बाबतीत असणाऱ्या त्रुटी दुरुस्त केल्या जात नाही तोपर्यंत वेतन आयोगाच्या शिफारसी त्यांना मान्य नाहीत.

माहितीनुसार सरकार थकबाकी असलेलं वेतन जवानांना देण्यासाठी पर्याय शोधते आहे. तिन्ही सेना प्रमुखांना पाठवलेल्या ऑर्डरनुसार थकबाकी असलेली रक्कम ही जानेवारी 2016 च्या पगारानुसार देण्यात येणार आहे. आता दिली जाणारी रक्कम ही रिवाइज्ड पे स्केलवर एरिअरच्या फायनल कॅलक्युलेशनमध्ये अॅडजस्ट करण्यात येणार आहे.