माझे मित्र मोदी हार्डवर्कर आहेत - करूणानिधी

लोकसभा निवडणुका जवळ येत असतांना भाजपच्या मित्र पक्षांच्या संख्येतही वाढ होतांना दिसतेय.

Updated: Feb 28, 2014, 08:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
लोकसभा निवडणुका जवळ येत असतांना भाजपच्या मित्र पक्षांच्या संख्येतही वाढ होतांना दिसतेय.
बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या रूपाने चांगला मित्र मोदींना मिळाल्यानंतर, आता थेट दक्षिण भारतात तामिळनाडूमधून करूणानिधींसारखा मित्र नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे.
डीएमके प्रमुख एम करूणानिधी यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या सलग प्रचारावरून हे लक्षात येत आहे, की ते हार्डवर्कर आहेत, तसेच नरेंद्र मोदी हे सुद्धा माझे चांगले मित्र आहेत.
तामिळनाडूमधील दिनामलार दैनिकात करूणानिधी यांचं वक्तव्य छापून आलं आहे. याआधीही करूणानिधी यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही मोदी आपले चांगले मित्र असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यांना भाजपशी युती न करता, जयललिता तिसऱ्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.
यानंतर करूणानिधी यांच्या वक्तव्यावरून भाजपला करूणानिधी लोकसभेत मदत करतील असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
या आधीही लोक जनशक्ती पार्टी एनडीएत सामिल झाल्यानंतर भाजपच्या आणखी अपेक्षा उंचावल्या आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.