नाना पाटेकरांचा 'मृत' आचारी म्हणतोय, 'मी जिवंत आहे...'

अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे आचारी म्हणून कामाला असलेला आचारी गेल्या १३ वर्षांपासून आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. 

Updated: Jun 2, 2016, 09:16 PM IST
नाना पाटेकरांचा 'मृत' आचारी म्हणतोय, 'मी जिवंत आहे...' title=

नवी दिल्ली : अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे आचारी म्हणून कामाला असलेला आचारी गेल्या १३ वर्षांपासून आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. 

मुंबईत २००३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात संतोष मूरत सिंह याला त्याच्या नातेवाईकांची मृत म्हणून घोषित केलं. यानंतर संतोषच्या नातेवाईकांनी त्याची गावची १८ बीघा जमीन आपल्या नावावर करून घेतली होती. आपला हक्क सांगायला गेला तेव्हा नातेवाकांनीच त्याला बदडून बदडून गावातून हाकलून दिलं. त्यानंतरचा संतोषचा स्वत:ला जिवंत दाखवण्याचा संघर्ष आजतागायत सुरू आहे.  

प्रेमविवाह केला म्हणून...

संतोष वाराणसी चौबेपूरच्या छितौनी गावाचा रहिवासी... नातेवाईकांनी हडपलेली जमीन परत मिळवण्यासाठी संतोषनं खूप प्रयत्न केले... पण, त्याच्या पदरात अपयशच पडलं. त्याच्या गावातील लोकांनीही त्याला साथ नाकारली... कारण, संतोषनं याच एका दलित तरुणीसोबत संसार थाटला होता... यामुळे त्याच्या समाजानं त्याला नाकारलंय. 

...म्हणून राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज केला दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा क्षेत्रा राहणाऱ्या संतोषनं 'मी जिवंत आहोत' सांगत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीही भेट घेतलीय. इतकंच नाही तर आपण जिवंत आहोत हे सांगण्यासाठी त्यानं २०१२ साली राष्ट्रपती निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केला होता.

नाना आणि संतोषची ओळख

२००३ साली प्रदर्शित झालेल्या 'आंच' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नाना पाटेकर चौबेपूरमध्ये दाखल झाले होते. संतोषची ओळख झाल्यानंतर नानांनी या उमद्या तरुणाला आपल्यासोबत मुंबईला आणलं. इथंच संतोषनं एका मराठी दलित तरुणीसोबत प्रेमविवाह केला. संतोषच्या आई-वडिलांचं याआधीच निधन झालंय... त्याच्या तीनही बहिणींचे विवाह झालेत. नातेवाईकांनीच फायदा उठवला असला तरी नानांचं सहकार्य मात्र आजही संतोषला मिळतंय.