विद्यापीठांमध्ये फडकणार तिरंगा

नवी दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठामध्ये भारताविरोधी घोषणा देण्यात आल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. 

Updated: Feb 19, 2016, 09:17 AM IST
विद्यापीठांमध्ये फडकणार तिरंगा title=

नवी दिल्ली:  नवी दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठामध्ये भारताविरोधी घोषणा देण्यात आल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्या म्हणजेच 46 केंद्रीय विद्यापीठांमध्ये रोज तिरंगा फडकवण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी देशभरातील केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.