हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणं आता बंधनकारक असणार नाही.

Updated: Apr 21, 2017, 05:11 PM IST
हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही title=

नवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणं आता बंधनकारक असणार नाही. केंद्र सरकारनं याबाबतच्या नियमांना मंजुरी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेतला जातो. सरकारनं सर्व्हिस चार्जमधून ही सूट दिलेली असली तरी ग्राहकांना सर्व्हिस टॅक्समधून मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.

सर्व्हिस चार्ज म्हणजे नेमकं काय?

हॉटेलमध्ये गेल्यावर आपण वेटरला त्यानं दिलेल्या सर्व्हिस बद्दल टीप म्हणून ठराविक रक्कम देतो. काही हॉटेलमध्ये मात्र टीप घ्यायच्या ऐवजी बिलामध्येच सर्व्हिस चार्जची रक्कम जमा केली जाते. बिलामध्येच समाविष्ट केलेली सर्व्हिस चार्जची रक्कम हॉटेलनंच ठरवलेली असते.