विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त

विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या दरात ४ रूपयांनी घट केली आहे.

PTI | Updated: Apr 2, 2016, 08:08 AM IST
विनाअनुदानित एलपीजी गॅस  सिलिंडर स्वस्त title=

नवी दिल्ली : विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या दरात ४ रूपयांनी घट केली आहे.

अनुदानित १२  सिलिंडरनंतरचा हा सिलिंडर स्वस्तात मिळणार आहे. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. विनाअनुदानित एलपीजी गॅस  सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. १४ पॉईंट २ किलो वजनाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडर दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. 

ग्राहकांना वर्षाला १२ अनुदानित गॅस  सिलिंडर मिळताता. या १२ सिलेंडरनंतर खरेदी करावा लागणाऱ्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी हा नवा दर लागू असेल. लागोपाठ तिसऱ्यांदा गॅस  सिलिंडर दरात ही कपात करण्यात आली आहे.