भारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं?

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचा दौरा केला, मात्र या तीन दिवसीय भारत दौऱ्यामुळे ओबामांचं आयुष्य सहा तासांनी घटलं आहे, असा दावा अमेरिकन मीडियानं करायला सुरूवात केली आहे.

Updated: Jan 28, 2015, 08:39 PM IST
भारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं? title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचा दौरा केला, मात्र या तीन दिवसीय भारत दौऱ्यामुळे ओबामांचं आयुष्य सहा तासांनी घटलं आहे, असा दावा अमेरिकन मीडियानं करायला सुरूवात केली आहे.

ओबामांचे आयुष्यातले दिवसाला दोन तास म्हणजे एकूण सहा तास दिल्लीतील प्रदूषणामुळे कमी झाले. शिवाय ओबामांच्या आरोग्याला एका दिवसांत ८ सिगरेट्स पिऊन जेवढी हानी होत नाही, तेवढी दिल्लीतील प्रदूषणामुळे झाली, असे कँब्रिज विद्यापीठातील प्रदुषण विषयातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दिल्लीमधल्या वायू प्रदूषणाचा उल्लेख करत अमेरिकन मीडियानं हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी अधिक असल्याने ओबामांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे ओबामांचा दौरा सुरु होण्याआधीच दिल्लीतल्या वायू प्रदूषणाबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. 

अमेरिकन दूतावासाकडून त्यासाठी तब्बल १८०० एअर प्युरिफायर्सही खरेदी करण्यात आले होते. विशेष म्हणजे जगात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका दोन नंबरवर आहे, तर तिसरा क्रमांक भारताचा आहे. तरीही अमेरिकन मीडियाने हा अजब दावा केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.