व्हिडिओ : विमानात महिलेची छेडछाड; 'ती'नं शिकवला चांगलाच धडा!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय... मुलींच्या छेडछाडीची अनेक प्रकरण रस्त्यारस्त्यावर घडलेली दिसून येतात... पण, केवळ रस्तेच नाहीत तर आकाशात उडत असतानाही मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतंय.... याचंच एक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

Updated: Feb 3, 2015, 11:41 AM IST
व्हिडिओ : विमानात महिलेची छेडछाड; 'ती'नं शिकवला चांगलाच धडा! title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय... मुलींच्या छेडछाडीची अनेक प्रकरण रस्त्यारस्त्यावर घडलेली दिसून येतात... पण, केवळ रस्तेच नाहीत तर आकाशात उडत असतानाही मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतंय.... याचंच एक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

विमानातून प्रवास करत असताना एका महिलेला छेडछाडीला सामोरं जावं लागलंय... यावर, तिनं हा प्रकार शांतपणे सहन न करता संबंधित वयस्कर व्यक्तीला चांगलाच धडा शिकवलाय. 

विमानात एकटी प्रवास करत असलेल्या या महिलेच्या मागच्या सीटवर बसलेल्या एका वयस्कर व्यक्तीनं सीटच्यामध्ये हात घालून चुकीच्या पद्धतीनं या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दोन वेळा घडल्यानंतर मात्र या मुलीच्या सहनशक्तीचा अंत झाला. 

आपल्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत या मुलीनं सर्वांदेखत या वयस्कर व्यक्तीची चांगलीच शाळा घेतली. इतकंच नाही तर फ्लाईट क्रू आणि नंतर एअरपोर् पोलिसांकडे तिनं रितसर तक्रारही नोंदवली. त्यानंतर या व्यक्तीवर एफआयआर दाखल करण्यात आलीय.   

व्हिडिओ पाहा (भाग 1) :-

 

आरोपी रविन झुनझुनवाला यांनी आपलं बिंग फुटल्यानंतर अनेकदा महिलेची माफीही मागितली... पण, तिनं मात्र माघार घेतली नाही. उल्लेखनीय म्हणजे, झुनझुनवाला ऑर्निड आणि शाश्वत ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आहेत.

व्हिडिओ पाहा (भाग 2) :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.