आउटलूक मासिकाने मागितली गृहमंत्री राजनाथ सिंहची माफी

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची आउटलूक या मासिकाने माफी मागितली आहे. सोमवारी लोकसभेच्या अधिवेशनात सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांनी आउटलूक या मासिकात छापून आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावरून आरोप केले होते. त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर '८०० वर्षानी देशात हिंदू शासक' सत्तेत आल्याचे म्हटले होते. 

Updated: Dec 1, 2015, 12:06 PM IST
आउटलूक मासिकाने मागितली गृहमंत्री राजनाथ सिंहची माफी title=

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची आउटलूक या मासिकाने माफी मागितली आहे. सोमवारी लोकसभेच्या अधिवेशनात सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांनी आउटलूक या मासिकात छापून आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावरून आरोप केले होते. त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर '८०० वर्षानी देशात हिंदू शासक' सत्तेत आल्याचे म्हटले होते. 

आउटलूकडून याविषयी असे स्पष्टीकरण देण्यात आले की राजनाथ सिंह यांनी केलेले विधान कोणतीही शाहनिशा नकरताच प्रकाशित केले होते. 

देशात वाढत चालेल्या असहिष्णतेच्या मुद्द्यावरून विधानसभेत बराच वेळ गदारोळ चालत राहिला. चर्चेला सुरूवात करताना सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांनी आउटलूकमध्ये छापून आलेल्या राजनाथ सिंह यांच्या '८०० वर्षानंतर हिंदू शासक' भेटलेल्या विधानाबदल आरोप केले त्यामुळे बराच वेळ संसदेत गदारोळ झाला. यानंतर सलीम यांनी असे म्हटले की अशा प्रकारचे विधान केलेल्या गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.