आलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान

देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Updated: Mar 9, 2015, 11:06 PM IST
आलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान title=

नवी दिल्ली: देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आलमच्या सुटकेबाबतचा आक्रोश हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व देशाचा असून असून यात पक्षीय राजकारण नको असंही त्यांनी सुनावलं.

फुटीरतवादी नेता मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी लोकसभेत गदारोळ माजवल्यानंतर याच मुद्यावर लोकसभेत स्पष्टीकरण देताना त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असं स्पष्ट केलं. फुटीरतावादी आणि दहशातवादाविरोधात लढा देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत याप्रकरणी योग्य ती पावलं उचलू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कुठलीही चर्चा केलेली नाही, असं सांगत काश्मीरमधील घटनांबद्दल आम्ही अनभिज्ञ असल्याचंही ते म्हणाले. 

मसरत आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत गदारोळ माजवला होता. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली आहे. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्यानं सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.