'मानवी इतिहासातील हा काळा दिवस'

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी पेशावरवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

Updated: Dec 16, 2014, 07:04 PM IST
'मानवी इतिहासातील हा काळा दिवस' title=

नवी दिल्ली : नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी पेशावरवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

'आजचा दिवस म्हणजे मानवी इतिहासातील काळा दिवस आहे. या हल्ल्यात आपल्याच शंभरपेक्षा अधिक बालकांचा बळी गेला आहे.' असं कैलाश सत्यार्थी यांनी म्हटलंय.
 
ट्‌विटरद्वारे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘युद्धामध्ये बालके हेच पहिले बळी ठरतात. आपण एकत्र येऊन हा हिंसाचार थांबवायला हवा. पाकिस्तान सरकारने बालके आणि विद्यालये हिंसाचरमुक्त करण्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलणे आवश्‍यक आहे. 

हल्ल्याच ठार झालेल्या बालकांच्या नातेवाईकांसमवेत आम्ही आहोत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.