पेट्रोल दरात ८२, तर डिझेल ६१ पैशांनी वाढ

 मागील सहा महिन्यापासून इंधनाचे दर कमी होत होते,  मात्र आज पेट्रोलच्या दरात ८२, तर डिझेल दरात ६१ पैशांनी वाढ झाली आहे.  हे दर रविवारी रात्रीपासून लागू होणार आहेत. 

Updated: Feb 16, 2015, 03:16 PM IST
पेट्रोल दरात ८२, तर डिझेल ६१ पैशांनी वाढ title=

नवी दिल्ली :  मागील सहा महिन्यापासून इंधनाचे दर कमी होत होते,  मात्र आज पेट्रोलच्या दरात ८२, तर डिझेल दरात ६१ पैशांनी वाढ झाली आहे.  हे दर रविवारी रात्रीपासून लागू होणार आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर खाली येत होतो, म्हणून ऑगस्ट २०१४ पासून दर सातत्याने कमी होत होते. मात्र त्यानंतर प्रथमच आज इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. 

ऑगस्ट २०१४ पासून आजपर्यंत पेट्रोलचे दर १०  वेळा तर ऑक्‍टोबरपासून डिझेलचे दर सहा वेळा कमी करण्यात आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.