येथे आई बनल्यावर होतो तरूणीचा विवाह, घटस्फोटापूर्वी हजारवेळा विचार करावा लागतो

 भारत हा वैविध्यतेचा देश आहे. या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासंबधी एक विचित्र परंपरा आहे. हो पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील टोटोपडा लोकवस्तीत एक विचित्र लग्न परंपरा आहे. 

Updated: Aug 18, 2015, 09:57 PM IST
येथे आई बनल्यावर होतो तरूणीचा विवाह, घटस्फोटापूर्वी हजारवेळा विचार करावा लागतो title=

नवी दिल्ली :  भारत हा वैविध्यतेचा देश आहे. या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासंबधी एक विचित्र परंपरा आहे. हो पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील टोटोपडा लोकवस्तीत एक विचित्र लग्न परंपरा आहे. 

लग्नापूर्वी आई होणे गरजेचे आहे. लग्नपूर्वी तरूणीला आई होणे गरजेचे आहे. आई नाही झाली तर लग्न होत नाही. टोटो प्रजातीत सुरूवातीला मुलगा आपल्या आवडत्या मुलीला पसंत करतो आणि तिला पळवून घेऊन जातो. त्यानंतर एक वर्ष शारिरीक संबंध ठेवतो. या दरम्यान ती गर्भवती झाली तर तिला विवाह योग्य समजले जाते. त्यानंतर दोघांना विवाहाच्या पवित्र बंधनात अडकविले जाते. 

घटस्फोट घेणे खूप अवघड

टोटो प्रजातीत लग्नाचे जितके वेगळे नियम आहेत त्यापेक्षा वेगळे नियम आहेत. घटस्फोटासाठी एक वेगळ्या प्रकारची पूजा करावी लागते ती खूप खर्चीक आहे. त्यामुळे लग्न तोडण्यापूर्वी १० वेळा विचार करावा लागतो. त्यामुळे लग्नात विचार करत नाही त्यापेक्षा अधिक विचार घटस्फोटासाठी करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.