पुढच्या वर्षी आपल्या हातात प्लास्टिक नोटा

लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहेत. या योजनेवर रिझर्व्ह बँक लवकरात लवकर काम करणार आहे. बनावट नोटाच्या समस्यावर मात करण्यासाठी प्लास्टिक नोटा बाजारात आणणार असल्याची वृत्त एका आर्थिक वृत्तपत्राने माहीती दिलेली आहे.

Updated: Aug 25, 2014, 05:45 PM IST
पुढच्या वर्षी आपल्या हातात प्लास्टिक नोटा   title=

मुंबई : लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहेत. या योजनेवर रिझर्व्ह बँक लवकरात लवकर काम करणार आहे. बनावट नोटाच्या समस्यावर मात करण्यासाठी प्लास्टिक नोटा बाजारात आणणार असल्याची वृत्त एका आर्थिक वृत्तपत्राने माहीती दिलेली आहे.

पुढील वर्षी प्लास्टिक नोटा बाजारात दाखल होणार असून सुरक्षेच्या दृ्ष्टीने योग्य अशी रचना करण्यात आलेली आहे. तसेच कागदाची नोट लवकर खराब होते या नोटाच आयुष्य कमी असतं तसेच पाण्यात किंवा ओलावा या नोटा सहन नाही करू शकत नसल्यामुळे प्लास्टिक नोटांना रिझर्व्ह बँकने आपल्या वार्षिक अहवालात पसंती दिली आहे. या नोटाच आयुष्य जास्तीत जास्त काळ टिकून राहावे अशी व्यवस्था रिझर्व्ह बँक करण्याच्या प्रयत्न करत आहे. यासाठी बँकने जानेवारीपासून प्लास्टिक नोटा छापण्यासाठी एक पत्रक जाहीर केलं होत

.रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मेमध्ये या संदर्भात सूचित केलं होत. 2015 ला या नोटा बाजारात दाखल केल्या जातील. तसेच या नोटांना पहिल्यांदा पाच शहरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात  कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरांचा समावेश आहे. या शहारांमध्ये वेगवेगऴे वातावरण असल्यामुळे या शहराची निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदा कमी रकमेच्या नोटांनी याची सुरूवात केली जाणार आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.