जेव्हा पीएम मोदींच्या अकाउंटवर होऊ लागले 'जापनीज्' ट्विट्स

 पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्टपासून जपान दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे जपानशी थेट जोडले जाण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे. 

Updated: Aug 28, 2014, 03:28 PM IST
जेव्हा पीएम मोदींच्या अकाउंटवर होऊ लागले 'जापनीज्' ट्विट्स title=

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्टपासून जपान दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे जपानशी थेट जोडले जाण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे. 

पीएम मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी कनेक्ट राहण्यासाठी ओळखले जातात. पण आज काही जण अचानक हैराण झाले. जेव्हा पंतप्रधान मोदींच्या ट्विटर खात्यावरून जपानी भाषेत ट्विट येऊ लागले. लोकांना वाटले की काही गार्बेज पोस्ट झाले आहे. पण नंतर लक्षात आले की पंतप्रधान जापानच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या खास अंदाजात जपानी भाषेत ट्विट केले. 

आज पीए मोदींनी आपल्या ट्विटर खात्यावरून जपानी भाषेत एकानंतर एक ट्विट केले. जपानचे पीएम अबे शिंजो यांना टॅगही करताना पंतप्रधानांनी ट्विट केले की, ३० तारखेपासून जपानला येत आहे.  या भेटबाबत मी खूप उत्साहित आहे. ही भेट जपान आणि भारताच्या संबंधांना मजबूती देण्यात मदतशीर ठरणार आहे. 

पंतप्रधानांनी असेही लिहिले की पंतप्रधान बनल्यानंतर भारतीय उपखंडाच्या बाहेर ही त्यांची पहिली द्विपक्षीत यात्रा आहे. ही भेट जुलैमध्ये होणार होती. पण काही कारणांमुळे तसे झाले नाही. मला जपानसोबत भारताच्या संबंधांना नव्याने सुरू होण्याची आशा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.