मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी

 केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज रात्री मंत्रालय वाटप करण्यात आले. सर्वात मोठी बातमी म्हणजे स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 

Updated: Jul 5, 2016, 10:05 PM IST
मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी  title=

नवी दिल्ली :  केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज रात्री मंत्रालय वाटप करण्यात आले. सर्वात मोठी बातमी म्हणजे स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 

प्रकाश जावडेकर यांना बढती देण्यात आली असून त्यांना स्मृति इराणी यांचे खाते मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले आहे. 

मंत्रिमंडळ बदल 

१) स्मृति इराणी - वस्त्रोद्योग मंत्री 
२) प्रकाश जावडेकर - मनुष्यबळ विकास मंत्रालय 
३) जयंत सिन्हा - विमान उड्डायन 
४) एम जे अकबर - पराराष्ट्र मंत्रालय 
५) रवि शंकर प्रसाद - कायदा मंत्री 
६) वैकय्या नायडू - सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने
७) वीरेंद्र चौधरी - पोलाद मंत्री 
८) नरेंद्र तोमर - ग्राम विकास मंत्री 
९) विजय गोयल - जलस्त्रोत, क्रीडा, युवक कल्याण, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन
१०) मनोज सिन्हा - दूर संचार 
११) अनंत कुमार - संसदीय कामकाज मंत्री 
१२) सदानंद गौडा -  सांख्यकी आणि कार्यक्रम अमंलबजावणी

स्वतंत्र प्रभार - राज्यमंत्री 

१) अनिल दवे - वन, वातावरण बदल आणि पर्यावरण मंत्री 
२) संतोष कुमार गंगवार - अर्थ मंत्रालय 
३) फग्गन कुलस्ते - आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्य मंत्री 

१) डॉ. सुभाष भांबरे - संरक्षण राज्यमंत्री 
२) रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री 
३) हंसराज आहीर - गृह राज्यमंत्री
४) चंदाप्पा जिगाजिनानी - पाणी आणि मल्लनिस्सारण मंत्री
५) एसएस अहलुविलिया - कृषी, शेतकरी कल्याण, संसदीय कामकाज 
६) अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण 
७) संतोष कुमार गंगवार - अर्थ मंत्रालय 
८) फग्गन कुलस्ते - आरोग्य आणि कुटुंब कल्याण