दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिमांना शासकीय लाभ नको - तोगडीया

विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांनी 'द ऑर्गनायझर' या 'आरएसएस'च्या मुखपत्रात वादग्रस्त लिखाण केलं आहे.

Updated: Sep 3, 2015, 01:50 PM IST
दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिमांना शासकीय लाभ नको - तोगडीया title=

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांनी 'द ऑर्गनायझर' या 'आरएसएस'च्या मुखपत्रात वादग्रस्त लिखाण केलं आहे.

जे मुसलमान दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म देतील, अशा कुटुंबाला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ देण्यास मनाई करण्यात यावी, रेशनिंग, नोकरी आणि शैक्षणिक सवलतीही अशा मुस्लिमांना बंद करण्यात याव्यात.

प्रवीण तोगडीया यांनी असंही म्हटलंय की, 'हीच वेळ आहे, वेळीच रोखण्याची'.

एवढंच नाही तर दोनपेक्षा जास्त मुलांना जन्म देण्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद देखील करण्यात यावी, असं प्रवीण तोगडीया यांनी 'द ऑर्गनायझर' मध्ये लिहलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.