टॅक्सी ड्रायव्हरच्या जनधन खात्यात जमा झाले तब्बल 9800 कोटी रुपये

सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटांसाठी लोक त्रस्त झालेत. यातच तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर काय कराल? पंजाबमधील एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत असेच काहीसे घडलेय. 

Updated: Nov 29, 2016, 09:21 AM IST
टॅक्सी ड्रायव्हरच्या जनधन खात्यात जमा झाले तब्बल 9800 कोटी रुपये title=

चंदीगड : सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटांसाठी लोक त्रस्त झालेत. यातच तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर काय कराल? पंजाबमधील एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत असेच काहीसे घडलेय. 

बलविंदर सिंग नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल 9800 कोटी रुपये जमा झालेत. बलविंदर यांचे स्टेट बँक ऑफ पटियालामध्ये खाते आहे. बँकेच्या चुकीने त्यांच्या खात्यात 98,05,95,12,231 रुपये जमा झालेत. 

दुसऱ्याच दिवशी बँकेने ही चूक सुधारत त्यांच्या खात्यातून पैसे परत घेतले. दरम्यान, इनकम टॅक्सकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.