मोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ किती शिकलंय... तुम्हीच पाहा!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात नव्या 19 चेहऱ्यांना संधी मिळालीय. जाणून घेऊयात, मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या या नव्या लोकप्रतिनिधींचं शिक्षण किती आहे.  

Updated: Jul 5, 2016, 06:36 PM IST
मोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ किती शिकलंय... तुम्हीच पाहा! title=

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात नव्या 19 चेहऱ्यांना संधी मिळालीय. जाणून घेऊयात, मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या या नव्या लोकप्रतिनिधींचं शिक्षण किती आहे.  

मंत्रिमंडळातील या नव्या 19 चेहऱ्यांपैकी सहा जण वकील आहेत, एक कर्करोग तज्ज्ञ तर एक जण पीएचडीधारक आहे. तसंच या टीममध्ये चार मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय, पाच जणांनी पदवी मिळवलेली आहे. तर दोन जणांची मात्र पदवीही घेतलेली नाही. 

  • पी पी चौधरी - वकील, सर्वोच्च न्यायालय

  • विजय गोएल - वकील

  • फग्गन सिंग कुलस्ते - वकील

  • अर्जुन राम मेघवाल - वकील

  • एसएस अहलुवालिया - वकील

  • राजन गोहेन - वकील

  • डॉ. सुभाष रामराव भामरे - कर्करोग तज्ज्ञ 

  • क्रिष्णा राज - पदव्युत्तर शिक्षण

  • अनुप्रिया पटेल - पदव्युत्तर शिक्षण

  • सीआर चौधरी - पदव्युत्तर शिक्षण

  • अनिल महादेव - पदव्युत्तर शिक्षण

  • महेंद्रनाथ पांडे - पीएचडी 

  • एमजे अकबर - पदवी

  • रमेश जिगाजीनागी - पदवी

  • जसवंत भाभोर - पदवी

  • पुरुषोत्तम रुपाला - पदवी

  • मनसुख मानदाविया - पदवी

  • अजय टामटा - अंडरग्रॅज्युएट

  • रामदास आठवले - अंडरग्रॅज्युएट