किती आहे रघुराम राजन यांचा पगार ?

भारतातल्या सगळ्यात प्रमुख संस्था असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आरबीआयमध्ये सर्वाधिक पगार मिळत नाही.

Updated: Apr 24, 2016, 05:57 PM IST
किती आहे रघुराम राजन यांचा पगार ? title=

मुंबई: भारतातल्या सगळ्यात प्रमुख संस्था असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आरबीआयमध्ये सर्वाधिक पगार मिळत नाही. रघुराम राजन यांना महिन्याला 1,98,700 रुपये पगार मिळतो. यामध्ये बेसिक 90,000 डीए 1,01,700 आणि इतर 7,000 याचा समावेश आहे. 

पण आरबीआयमध्ये काम करणाऱ्या गोपालकृष्ण हेगडे (4 लाख), अन्नामलाई अरापल्ली गाऊंडर (2,20,355) आणि व्ही. केंडास्वामी (2.1 लाख) यांचा पगार रघुराम राजन यांच्यापेक्षा जास्त आहे. 

आरबीआयनं वेबसाईटवर टाकलेले हे आकडे जून-जुलै 2015 सालचे आहेत. पण आता हे तिघं आरबीआयमध्ये काम करतात का याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसंच हे तिघं आरबीआयमध्ये कोणत्या हुद्द्यावर काम करतात हेही सांगण्यात आलेलं नाही. हेगडेंनी मात्र आरबीआयचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं होतं.