उत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस

उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Updated: Jul 3, 2016, 09:26 PM IST
उत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस title=

नवी दिल्ली : उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शिमला-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरही दरडी कोसळून वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते. महामार्गावर दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. जोरदार पावसामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करणे प्रशासनाला जिकिरीचे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासांमध्ये उत्तराखंडमध्ये आणखी जोराचा पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  विशेष: गंगेच्या पात्रातील लोकवस्तीला स्थलांतर करण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.