दिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार

सौदीच्या राजदूताच्या सचिवांवर दोन नेपाळी महिलांनी आरोप लावलाय. त्यांनी दोघींचं अपहरण करून एका फ्लॅटमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.

Updated: Sep 9, 2015, 02:17 PM IST
दिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार  title=

नवी दिल्ली: सौदीच्या राजदूताच्या सचिवांवर दोन नेपाळी महिलांनी आरोप लावलाय. त्यांनी दोघींचं अपहरण करून एका फ्लॅटमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदीच्या राजदूत सचिवांनी गुडगावमधील एका घरात मूळच्या नेपाळच्या असलेल्या दोन महिलांना अनेक दिवसांपासून बंधक बनवून ठेवलं होतं. तिथं त्यांच्यावर सतत बलात्कार करण्यात आला. सोमवारी पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि एनजीओनं दखल घेतल्यानंतर या महिलांना सोडवलं.

महिलांची धक्कादायक आपबिती

या दोन महिलांमधील एक ४४ वर्षीय महिला आहे तर दुसरी तिची २० वर्षीय मुलगी आहे. त्यांनी सांगितलेल्या घटनांनी सर्वांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. मुलगी म्हणाली, मागील चार महिने कोणत्याही श्रापापेक्षा आमच्यासाठी कमी नव्हते. आम्हाला वाटलं आम्ही लवकरच मरू आणि आमच्या कुटुंबियांचा मृतदेह सुद्धा दिसणार नाही. 

महिला आणि तिच्या मुलीला सौदी अरबच्या राजदूत सचिवाच्या घरातून सोमवारी सोडवण्यात आलं. महिलेनं सांगितलं, एका दिवसांत ७-८ जण आमच्यावर बलात्कार करायचे. त्यांनी आरोप केलाय की, सौदीला नेवून त्यांनी दोघींवर गँगरेपही केला. 

आणखी वाचा - 'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'

महिला आणि तिच्या मुलीला घरकामासाठी ठेवण्यात आलं होतं. पण नंतर त्यांना 'सेक्स स्लेव' बनवलं आणि त्यांच्यावर अनेक महिने अत्याचार केला. फक्त सौदी राजदूतच नाही तर त्यांचे मित्रही बलात्कार करायचे. अनेक वेळा दिवसातून ७-८ जण बलात्कार करायचे. हे सगळे सौदीचेच लोक असायचे. विरोध केला तर जीवे मारण्याची धमकी द्यायचे. 

महिलेनं सांगितलं, एक दिवस तर तिनं जेव्हा विरोध केला सौदी राजदूतानं तिच्या हातावर चाकूनं वार केला. कधी-कधी हे लोक दोघींना आग्रा, नैनितालला पण न्यायचे. काही पाहुणे यायचे ते सुद्धा बलात्कार करायचे. एवढंच नव्हे तर अनैसर्गिक आणि ओरल सेक्ससाठी पण हे नराधम दबाव टाकायचे, असं महिलेनं सांगितलं. 

सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश यांनी सांगितलं, पीडित महिला गुडगावच्या ज्या फ्लॅटमध्ये होत्या. तिथं घरगुती कामासाठी आणखी एका महिलेला पाठवण्यात आलं. त्या महिलेनं या दोघींची दुर्दशा पाहिली आणि तिथून निघून गेली. त्याच महिलेनं एका एनजीओला याची माहिती दिली आणि पोलिसांना सूचना दिली. गुडगाव पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकून महिलांना सोडवलं. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

आणखी वाचा - मृतदेहावर लिहलं, 'माझ्या बहिणीचा याने बलात्कार केला होता'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.