आरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदरात पाव टक्के कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.

Updated: Apr 5, 2016, 11:38 AM IST
आरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदरात पाव टक्के कपात title=

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.

आरबीआयने रेपो दर ६.७५ टक्क्यांवरुन ६.५० टक्क्यांपर्यंत कमी केलाय. आरबीआयच्या या निर्णयामुळे होम लोन तसेच कार लोन यांचा ईएमआय कमी होईल. 

नवे व्याजदर १६ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत. मात्र आरबीआयने रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढवून ५.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतलाय. 

आरबीआयने एमएसएफ दर ०.७५ टक्क्यांनी घटवून ७ टक्क्यांपर्यंत आणलेत. चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर ७.६ टक्के राहण्याची शक्यता आहे.