'पांचजन्य'मधून दादरी हत्याकांडाचं संघाकडून समर्थन

सध्या देशभरात दादरी हत्याकांड प्रकरण गाजतंय, या हत्याकांडाचं समर्थन संघाकडून करण्यात येत असल्याचं 'पांचजन्य'मधील मजकुरावरून सांगण्यात येतंय.

Updated: Oct 18, 2015, 10:54 AM IST
'पांचजन्य'मधून दादरी हत्याकांडाचं संघाकडून समर्थन title=

नवी दिल्ली : सध्या देशभरात दादरी हत्याकांड प्रकरण गाजतंय, या हत्याकांडाचं समर्थन संघाकडून करण्यात येत असल्याचं 'पांचजन्य'मधील मजकुरावरून सांगण्यात येतंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’मधून उत्तरप्रदेशातील दादरी हत्याकांडाचं समर्थन केलं आहे. 

दादरीमध्ये अखलाख या मुस्लीम व्यक्तीची घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरुन क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या क्रूर घटनेचं समर्थन केलं आहे. संघाने अशावेळी या घटनेचे समर्थन केले आहे, जेव्हा देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

‘पांचजन्य’मध्ये काय म्हटलंय?
“गोहत्या करणारा पापी असतो. त्यामुळे त्याला ठार करा, असा आदेश वेदांमध्ये दिला आहे. देशातील सर्व मदरशांमधील मौलवी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी द्वेषभावना निर्माण होईल, याचीच शिकवण देतात. दादरी येथील अखलाक याने कदाचित कुकर्मातूनच गायीची हत्या केली असावी, त्यामुळेच त्याला त्याचे प्रायश्चित्त मिळाले”.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुखपत्रातूनच दादरी हत्याकांडाचं समर्थन केल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार, असल्याचं दिसून येत आहे.

दादरीच्या क्रूर हत्याकांडाचा देशभरात निषेध करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी दादरीची घटना दुर्देवी असल्याचं म्हटलं होतं, मात्र संघाने समर्थन केल्यानंतर आता हा मुद्दा पुन्हा पुढे येणार असल्याचं दिसतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.