महिलेनं 18 दिवसांच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिलं

केवळ मत्सराखातर एका महिलेनं आपल्या नणंदेच्या केवळ 18 दिवसाच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिल्याची घटना घडलीय. 

Updated: Sep 6, 2016, 06:10 PM IST
महिलेनं 18 दिवसांच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिलं title=

कानपूर : केवळ मत्सराखातर एका महिलेनं आपल्या नणंदेच्या केवळ 18 दिवसाच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिल्याची घटना घडलीय. 

उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडल्याचं समोर येतंय. सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना स्पष्ट दिसतेय. 

तीन मुली असलेल्या ही महिला आपल्या नणंदाला मुलगा झाला म्हणून नाराज होती. त्यामुळेच तीनं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 

बाळाला एका फडक्यात गुंडाळून ही महिला इमारतीच्या गॅलरीत घेऊन आली होती... तिथून तिनं इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून या बाळाला फेकून दिलं होतं. 

जेव्हा आई-वडिलांना बाळ कुठेच सापडलं नाही तेव्हा त्यांनी पोलिसांना पाचारण केलं... दरम्यान हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना हे बाळ एका जाळीत अडकून पडलेल्या या चिमुरड्याच्या रडण्याचा आवाज ऐकला... तिथून त्यांना बाळाला सुखरूप बाहेर काढलं.  

दैव बलवत्तर म्हणून बाळाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. वॉर्डमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीवरून फेकलेलं हे बाळ एका जाळीत अडकून राहीलं... आणि त्यामुळेच ते जिवंत राहीलं. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतलंय.