धक्कादायक : सहा दिवसांच्या बाळाचं शरीर स्वत:हून घेतंय पेट

चेन्नईमध्ये एका सहा दिवसांच्या मुलाचं शरीर स्वत:हून पेट घेतंय. या मुलाला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. सध्या हा चिमुकला किलपॉक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली भरती करण्यात आलाय. 

Updated: Jan 20, 2015, 07:54 PM IST
धक्कादायक : सहा दिवसांच्या बाळाचं शरीर स्वत:हून घेतंय पेट  title=

चेन्नई : चेन्नईमध्ये एका सहा दिवसांच्या मुलाचं शरीर स्वत:हून पेट घेतंय. या मुलाला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. सध्या हा चिमुकला किलपॉक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली भरती करण्यात आलाय. 

हॉस्पीटलचे डॉक्टर एन. गुनसेकरन यांच्या म्हणण्यानुसार, या बाळाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आलेत. येत्या दोन दिवसांमध्ये याचे निष्कर्ष हाती येतील. त्यानंतर बाळावर इलाज सुरू करण्यात येतील.

मुलाची आई राजेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी या चिमुकल्याचे पाय आपोआप भाजून निघाले होते त्यानंतर त्याला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. धक्कादायक म्हणजे, बाळांच्या शरीरात स्वत:हून आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. या बाळाचा मोठा भाऊ राहुल याच्याबाबतीतही २०१४ साली हाच प्रकार घडला होता. 

२०१३ साली अडीच महिन्यांच्या राहुलचं शरीरही स्वत:हून पेट घेत असल्याकारणानं त्याला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं. चेन्नईपासून १६० किमी दूर विल्लपूरम भागात राहणाऱ्या राहुलचं शरीर जन्मानंतर ९ दिवसांनंतरच आपोआप भाजून निघालं होतं... 'लोकांना वाटलं की मीच राहुलला जाळण्याचा प्रयत्न केलाय' असं राजेश्वरी सांगतात.

महत्त्वाचं म्हणजे, अशाच प्रकारच्या गेल्या ३०० वर्षांत केवळ २०० केसेस समोर आल्या आहेत. पण, या आजाराबाबतीत अनेक प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यात आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.