मृत्यूनंतर सात वर्षांनी घरी परतला जवान

एका अपघात होतो... आणि या अपघातात सेनेच्या एका जवानाला मृत घोषित केलं जातं... आणि तब्बल सात वर्षानंतर हाच जवान आपल्या घरी दाखल होतो... विचार करा, एका आईची, एका बापाची, पत्नीची प्रतिक्रिया कशी असू शकेल... 

Updated: Jun 16, 2016, 03:56 PM IST
मृत्यूनंतर सात वर्षांनी घरी परतला जवान  title=

देहरादून : एका अपघात होतो... आणि या अपघातात सेनेच्या एका जवानाला मृत घोषित केलं जातं... आणि तब्बल सात वर्षानंतर हाच जवान आपल्या घरी दाखल होतो... विचार करा, एका आईची, एका बापाची, पत्नीची प्रतिक्रिया कशी असू शकेल... 

'तो' जिवंत समोर उभा होता

ही एखाद्या सिनेमाची कथा नाही तर सत्य घटना आहे. रिटायर्ड सुबेदार कैलाश यादव घरात झोपले असताना अचानक त्यांच्या दारावरची कडी वाजली... आणि दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही... कारण त्यांच्यासमोर उभा होता तो सेनेनं सात वर्षांपूर्वीच मृत घोषिक केलेला त्यांचा मुलगा... धर्मवीर सिंग... 

काय घडलं होतं... 

धर्मवीर देहरादूनमध्ये ६६ आर्मर्ड रेजिमेंटमध्ये जवान म्हणून तैनात होता. २००९ साली तो एका अपघातानंतर अचानक बेपत्ता झाला... नियमाप्रमाणे तीन वर्षानंतर सेनेनं त्याला मृतही घोषत केलं... त्यांचं डेथ सर्टिफिकेटही जारी करण्यात आलं. नियमाप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला पेन्शनही मिळू लागली. 

... आणि धर्मवीर घरी परतला

पण, नशिबाला मात्र काही वेगळाच खेळ दाखवायचा होता. अपघातानंतर आपली स्मरणशक्ती हरवलेला धर्मवीर असाच भटकत राहिला... पण, पुन्हा झालेल्या एका अपघातानंतर त्यांची हरपलेली शुद्ध परत आली... आणि ते आपल्या घरी दाखल झाले.