आता, इंटरनेटवरून करा मतदान!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लवकरच इंटरनेटवरून मतदान करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 27, 2015, 08:46 PM IST
आता, इंटरनेटवरून करा मतदान! title=

भारत : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लवकरच इंटरनेटवरून मतदान करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी याबाबतचं सूतोवाच केलंय. 'इंटरनेटवरून मतदान करण्याची सोय भविष्यात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, त्याआधी चुकाविरहित मतदारयाद्या तयार करणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट असणार आहे' असं ब्रह्मा यांनी म्हटलंय. 

मतदारयाद्या अचूक बनवण्यासाठी निवडणूक आयोगानं काय कार्यक्रम आखलाय. यानुसार, पहिल्यांदा नकली मतदारांवर आयोगाची करडी नजर आवश्यक असेल.

त्यासाठीच, ३ मार्च ते १५ ऑगस्ट दरम्यान मतदारयाद्यांमध्ये दुरूस्ती आणि छाननी मोहीम निवडणूक आयोगानं हाती घेतलीय. यासाठी, मतदार ओळखपत्र 'आधार कार्डा'शी जोडलं जाईल. मतदारांचे डुप्लिकेशन टाळण्यासाठी UIDAI (आधारकार्डावरचा क्रमांक) क्रमांक वापरला जाईल. परंतु, ज्या मतदारांकडे आधार कार्ड नसेल अशा मतदारांची डबल चेकिंग होईल. जवळपास ५० कोटी मतदारांकडे UIDAI क्रमांक उपलब्ध असल्याचं समजतंय.

मतदारयाद्यांतील डबल नाव काढून टाकण्यासाठी मतदार स्वच्छेने अर्ज करू शकतात. तसं आवाहनचं निवडणूक आयोगानं मतदारांना केलंय. अन्यथा कारवाई अशा मतदारांवर कारवाईचे संकेतही आयोगानं दिलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.