एसटीडी कॉलिंगचे दर खाली येणार

ट्रायने एका ऑपरेटर सर्व्हिसकडून दुसऱ्या ऑपरेटर सर्व्हिसला कॉल करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. हा कॉल ३५ पैसे प्रति मिनिट करण्यात आला आहे. यामुळे लँण्डलाईनच्या दरात  म्हणजेच एसटीडी दरात कपात होणार आहे.

Updated: Feb 25, 2015, 12:04 AM IST
एसटीडी कॉलिंगचे दर खाली येणार title=

नवी दिल्ली : ट्रायने एका ऑपरेटर सर्व्हिसकडून दुसऱ्या ऑपरेटर सर्व्हिसला कॉल करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. हा कॉल ३५ पैसे प्रति मिनिट करण्यात आला आहे. यामुळे लँण्डलाईनच्या दरात  म्हणजेच एसटीडी दरात कपात होणार आहे.

एसटीडीचे रेट ठरवण्यासाठी कॅरिअर दर महत्वाचा ठरतो, असं म्हटलं जातं, ट्रायचे सचिव सुधीर गुप्ता यांनी म्हटलं आहे की, ट्रायने लॅण्डलाईन कॅरिअर शुल्क सध्याच्या ६५ पैसे प्रति मिनिटावरून ३५ पैसे प्रतिमिनिट केला आहे. यामुळे एसटीडीचे दर कमी होऊ शकतात, ट्राय २०१७ आणि २०१८ मध्ये पुन्हा या दरांची समिक्षा करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.