`सहारा`जवळ पैसेच नाही, सुब्रतो रायचा जेलमधला मुक्काम वाढला

सहाराचे सुब्रतो राय यांना 3 एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्येच राहणार आहेत. जामीनासाठी दहा हजार कोटी रुपये नसल्याचं रॉय यांच्या वकिलांनी कोर्टाला सागितलं. रॉय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टानं सहमती दाखवली होती.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 27, 2014, 06:56 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सहाराचे सुब्रतो राय यांना 3 एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्येच राहणार आहेत. जामीनासाठी दहा हजार कोटी रुपये नसल्याचं रॉय यांच्या वकिलांनी कोर्टाला सागितलं. रॉय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टानं सहमती दाखवली होती.
जामीनासाठी कोर्टानं अटी ठेवल्या आहेत. 10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या अशी अट कोर्टानं ठेवली आहे... 5000 कोटी रोख आणि 5000 कोटी बँक गॅरेंटी या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात येणार आहे. पण आपल्याकडे दहा हजार कोटी रुपये नसल्याचं रॉय यांनी वकिलांमार्फत कोर्टाला सांगितल्यानं ते जेलमध्येच राहणार आहेत.
सुब्रतो राय यांना सहाराच्या गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रुपये परत करायचे आहेत. त्यामुळं कोर्टानं ही अट ठेवलीय. गेल्या ४ मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन आणि जे. एस. खेहर काहीतरी पर्याय, सवलत देतील, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, जामीन हवा असेल तर १० हजार कोटी रुपये भरा, असं त्यांनी पुन्हा निक्षून सांगितलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.