सरकारी वेबसाईटवर झळकली सनी लिऑन

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनची पॉर्नस्टार म्हणूनही ओळख आहे. जगभरात तसेच सोशल मीडियावरही सनीचे प्रचंड चाहते आहेत. 

Updated: Apr 26, 2016, 10:53 AM IST
 सरकारी वेबसाईटवर झळकली सनी लिऑन title=

हैदराबाद : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनची पॉर्नस्टार म्हणूनही ओळख आहे. जगभरात तसेच सोशल मीडियावरही सनीचे प्रचंड चाहते आहेत. असे असतानाच सोमवारी एका महापालिकेच्या वेबसाईटवर सनी लिऑनचा न्यूड फोटो झळकला आणि महापालिका अधिकाऱ्यांना दरदरुन घाम फुटला. सनीचा फोटो केवळ वेबसाईटच्या मेन पेजवरच नव्हे तर इतर पेजवरही दिसत होता. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी हा फोटो हटवण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. 

सर्वात आधी सनीचा अश्लील फोटो ग्रेटर हैदराबाद महापालिका ऑफसाइट रिअल टाईम मॉनिटरिंग सिस्टीमवर फ्लॅश झाला. यानंतर तातडीने आयटी टीमने हा फोटो मेन पेजवरुन हटवला. मात्र त्यानंतरही तो फोटो वेबसाईटच्या आतील पेजवर दिसत होता. 

दरम्यान, संपूर्ण दिवसभर हा फोटो वेबसाईटवरुन हटवण्याचे आयटी टीमचे प्रयत्न सुरु होते. जीएचएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सेंटर ऑफ गुड गर्व्हनंस ही वेबसाईट मेंटेन करते. दरम्यान सोमवार संध्याकाळपर्यंत ही साईट हॅक झाली होती अथवा डेटामधील चुकीमुळे हे घडले होते याचा तपास लागू शकला नव्हता.