महिलेच्या पोटातून निघाला ३५ किलोचा गोळा!

पंजाबमध्ये लुधियाना स्थित ओसवाल हॉस्पीटलमध्ये एका महिलेच्या पोटातून ३५ किलोची गाठ (ट्युमर) बाहेर काढण्यात आलीय. 

Updated: Sep 2, 2015, 02:08 PM IST
महिलेच्या पोटातून निघाला ३५ किलोचा गोळा! title=

चंदीगड : पंजाबमध्ये लुधियाना स्थित ओसवाल हॉस्पीटलमध्ये एका महिलेच्या पोटातून ३५ किलोची गाठ (ट्युमर) बाहेर काढण्यात आलीय. 

या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोटात असलेला ३५ किलोचा गोळा तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरला होता. ज्यामुळे, तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं. इतकंच नाही तर एकदा खाली बसल्यानंतर तिला उभं राहण्यासाठी तीन-चार लोकांची मदतही घ्यावी लागत होती. या महिलेचं नाव नीलम रानी आहे... ५० वर्षांची नीलम लुधियानामध्ये राहते. 

गेल्या सहा महिन्यांपासून पोटाचा आकार सतत वाढतच चालला होता. पोटातही खूप दुखत होतं. त्यामुळे चालणं-फिरणंही शक्य होत नव्हतं... डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी ऑपरेशन सांगितलं. पण, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं लवकर ऑपरेशनही करता येत नव्हतं. अशावेळी हॉस्पीटलनंच मदतीची तयारी दर्शवली, असं नीलम रानी यांनी म्हटलंय. 

तर, अशा पद्धतीचा ट्युमर महिलांमध्ये जास्त आढळतो... पण, हा ट्युमर काढल्यानंतर आता पीडित महिलेची तब्येत चांगली आहे... आणि येत्या काही दिवसांत ती आपली रोजची कामंही सहजपणे करू शकेल, असं डॉक्टरांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.