शशिकलांचा शपथविधी पुन्हा एकदा वादात

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललितांच्या अनेक वर्षांपासूनच्या सहकारी शशिकला नटराजन यांचा शपथविधी वादात अडकलाय. 

Updated: Feb 7, 2017, 08:23 AM IST
शशिकलांचा शपथविधी पुन्हा एकदा वादात title=

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललितांच्या अनेक वर्षांपासूनच्या सहकारी शशिकला नटराजन यांचा शपथविधी वादात अडकलाय. 

या शपथविधीवर स्थगिती आणावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. बेनामी मालमत्ता प्रकरणी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि भावी मुख्यमंत्री शशिकला यांच्यावर खटला सुरू आहे.

पुढल्याच आठवड्यात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता असताना शशिकला यांना शपथ घेऊ देऊ नये, अशी मागणी याचिकाकर्ते संथिल कुमार यांनी केलीय.

दुसरीकडे विरोधी पक्षांनीही शशिकला यांच्या या राज्याभिषेकावर आक्षेप घेतलाय. आजवर सक्रीय राजकारणात नसलेल्या आणि कोणत्याच सभागृहाच्या सदस्य नसलेल्या शशिकलांना थेट मुख्यमंत्री करणं अयोग्य असल्याचं काँग्रेस आणि डीएमकेनं म्हटलंय.