मड पॅक थेरपीसाठी ताजमहाल वर्षभर बंद

ताजचं सौंदर्य जपण्यासाठी त्याच्या मुख्य घुमटावर पुरातत्व विभागाच्या शास्त्रीय विभागातर्फे मड पॅक थेरपी करण्यात येणार आहे.

Updated: Oct 6, 2016, 09:00 AM IST
मड पॅक थेरपीसाठी ताजमहाल वर्षभर बंद  title=

आग्रा : ताजचं सौंदर्य जपण्यासाठी त्याच्या मुख्य घुमटावर पुरातत्व विभागाच्या शास्त्रीय विभागातर्फे मड पॅक थेरपी करण्यात येणार आहे. त्यासाठी ताजमहालचा मुख्य घुमट एप्रिल 2017 पासून पर्यटकांना बघता येणार नाही.

मडपॅक थेरपीचं काम एक वर्षभर चालणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागानं आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ताजमहाल बघायचा असेल तर एप्रिल 2017 आधीच जा, अन्यथा वर्षभर वाट बघावी लागेल.