ताजमहलमध्ये घडली अप्रिय घटना, पर्यटक थोडक्यात बचावले

ताजमहलच्या रॉयल गेटवर असलेलं 107 वर्ष जुना ब्रासचा लँप बुधवारी संध्याकाळी पडला. ताजमहल रिकामा करण्याच्या वेळी घडलेल्या या घटनेतून पर्यटक थोडक्यात बचावले. हा लँप 1908मध्ये लॉर्ड कर्झननं भेट म्हणून दिला होता. 

PTI | Updated: Aug 24, 2015, 03:44 PM IST
ताजमहलमध्ये घडली अप्रिय घटना, पर्यटक थोडक्यात बचावले title=

आग्रा: ताजमहलच्या रॉयल गेटवर असलेलं 107 वर्ष जुना ब्रासचा लँप बुधवारी संध्याकाळी पडला. ताजमहल रिकामा करण्याच्या वेळी घडलेल्या या घटनेतून पर्यटक थोडक्यात बचावले. हा लँप 1908मध्ये लॉर्ड कर्झननं भेट म्हणून दिला होता. 

इंग्रजांच्या काळातील हा लँप पडल्यानं एएसआय अधिकाऱ्यांनी एका खोलीत ठेवून कपड्यानं तो झाकून दिला. ही घटना लपविण्याचा प्रयत्न ते लोक करत होते. मीडिया गेल्यानंतर त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना खोलीबाहेर काढण्यात आलं.

ताजमहलचं मुख्य प्रवेशद्वार 'रॉयल गेट'वर 1908 मध्ये तत्कालीन व्हाइसराय लॉर्ज कर्झननं दोन लँप मागवले होते. ज्यातील एक रॉयल गेटवर होता तर दुसरा ताजमहलच्या मुख्य ठिकाणी म्हणजे शाहजहान आणि मुमताजच्या कब्रच्या वर लावण्यात आला. 

ब्रिटीशकाळात आग्र्यात वीज आल्यानंतर या लँपमध्ये बल्ब लावण्यात आला, ज्याच्या प्रकाशानं मुख्य घुमटामधील अंधार दूर झाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.