'सेल्फी' काढणं पडलं महाग, गेला जीव!

आज काल आपल्याच मोबाईलनं 'सेल्फी' काढणं खूप प्रचलित झालं. मात्र कधी-कधी सेल्फी काढणं आपल्या जीवावर बेतू शकतं. सेल्फी काढताना एका चिमुरड्यानं आपला जीव गमावलाय. केरळमध्ये एक मुलगा ट्रेनच्या छतावर उभा राहून सेल्फी काढत होता. यादरम्यान तो ट्रेनवर असलेल्या हाय व्होल्टेज विजेच्या तारांमध्ये सापडला आणि त्याचा जीव गेला. 

Updated: Aug 13, 2014, 01:34 PM IST
'सेल्फी' काढणं पडलं महाग, गेला जीव!  title=
प्रातिनिधिक फोटो

तिरूवनंतपुरम : आज काल आपल्याच मोबाईलनं 'सेल्फी' काढणं खूप प्रचलित झालं. मात्र कधी-कधी सेल्फी काढणं आपल्या जीवावर बेतू शकतं. सेल्फी काढताना एका चिमुरड्यानं आपला जीव गमावलाय. केरळमध्ये एक मुलगा ट्रेनच्या छतावर उभा राहून सेल्फी काढत होता. यादरम्यान तो ट्रेनवर असलेल्या हाय व्होल्टेज विजेच्या तारांमध्ये सापडला आणि त्याचा जीव गेला. 

या मुलाचं नाव शिहाबुद्दीन आहे. तो 14 वर्षांचा असून त्रिशूरचा राहणारा होता. शिहाबुद्दीन मंगळवारी एका मालगाडीवर उभा होऊन सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा बॅलेंस बिघडला आणि तो विजेच्या तारांच्या संपर्कात आला. ही घटना शोरनूर रेल्वे स्टेशनची आहे. शालेय विद्यार्थ्याला गंभीर परिस्थितीत त्रिशूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

आजकाल स्मार्टफोन्सच्या जमान्यात सेल्फी काढण्याचं खूप वेड तरुणांमध्येच नाही तर वृद्ध आणि लहानग्यांमध्येही वाढलंय. मात्र आपण सेल्फी घेतांना जरा काळजी घ्यावी. रेल्वे, बस, रस्ता, नदी, आग, जहाज, नाव अशा ठिकाणी सेल्फी घेतांना जरा काळजी घ्यावी, नाहीतर जीव जावू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.