दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी  दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) 2 जवान शहीद झाले तर ४ जवान जखमी झाले. ही घटना दक्षिणी कश्मीरच्या पुलवामा जिल्हात झाली असून या ठिकाणात हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ११ ऑगस्टला पंपोरा या ठिकाणी बीएसएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ८ जण गंभीर जखमी झाले होते.

Updated: Aug 16, 2014, 08:05 PM IST
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद title=

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी  दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) 2 जवान शहीद झाले तर ४ जवान जखमी झाले. ही घटना दक्षिणी कश्मीरच्या पुलवामा जिल्हात झाली असून या ठिकाणात हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ११ ऑगस्टला पंपोरा या ठिकाणी बीएसएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ८ जण गंभीर जखमी झाले होते.

तसेच स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला (14 ऑगस्ट) दहशतवाद्यांनी संबोरा या ठिकाणी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला होता.  यामध्ये दोन पोलीस आणि एक नागरिकांचा मृत्यू  झाला. काही दिवसांपासून तर सीमारेषेवर पाकिस्तानकडून लागोपाठ शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.