बलात्कारला फॅशनेबल कपडेच जबाबदार - रेड्डी

आंध्र प्रदशाचे पोलीस महासंचालक दिनेश रेड्डी यांनी बादग्रस्त विधान करून खळबल उडवून दिली आहे. महिलांवर बलात्कार होण्यास त्यांचे फॅशनेबल कपडेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Updated: Dec 31, 2011, 05:57 PM IST

झी २४ तास वेब टीम, हैदराबाद

आंध्र प्रदशाचे पोलीस महासंचालक दिनेश रेड्डी यांनी बादग्रस्त विधान करून खळबल उडवून दिली आहे. महिलांवर बलात्कार होण्यास त्यांचे फॅशनेबल कपडेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आज काल महिला नवनवीन फॅशनेबलचे तंग कपडे वापरत आहेत. खेडेगावामध्येही ही फॅशन आहे. यामुळेच बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वर्षात बलात्काराच्या एकूण १२९१ घटना घडल्या आहेत, असा दाखला  दिनेश रेड्डी यांनी  दिला आहे. बलात्कारासारख्या घटनांला महिलांच्या  फॅशनचे कपडेच जबाबदार असल्याचे रेड्डींनी म्हटले आहे.

दरम्यान, पोलीस महासंचालक महिलांवर बंधने लादू शकत नाहीत. त्यांनी काय परिधान करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, महिलांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे मत राज्याच्या गृहमंत्री सविता इंद्र रेड्डी यांनी व्यत्क केले.