नववर्षाची भेट, शेअर मार्केटमध्ये विदेशींची उडी थेट!

भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे. थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

Updated: Jan 2, 2012, 04:08 PM IST

24taas.com, मुंबई

भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे.  थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून  रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. हा निर्णय १५ जानेवारीपर्यंत अंमलात आणण्यासंदर्भात सेबी तसेच रिजर्व बँक ऑफ इंडियाला निर्देश देण्यात येतील असं अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

 

परदेशी नागरिकांना भारतीय शेअर बाजारात थेट गुंतवणुकीस अद्याप परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यांना परदेशी गुंतवणूक म्युच्युअल फंड वगैरेंच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या गुंतवणुकीची परवानगी होती. या उपायामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असं जाणकारांचे म्हणणे आहे.
बाजारात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, बाजारातील अस्थिरता दूर करणे, आणि शेयर बाजाराला मजबूत करण्यासाठी हा उपाय योजन्यात आला आहे. २०११ मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी सहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे समभाग खरेदी केले होते असे सेबीच्या अहवालात नमूद केले आहे. परंतु यापेक्षा जास्त किमतीच्या समभागांची विक्री केली होती. परिणामी २७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शेयर बाजारातून निघाला होता.

 

२०१० या वर्षात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेयर बाजारात १.३ लाख कोटी रुपये गुंतविले होते. भारत ही आशियातली तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु २०११ मध्ये यातील ३० समभागांमध्ये २४.६ टक्क्याची घसरण झाली होती. परिणामी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत २४ टक्क्याने घसरली होती.