परदेशी पाहुण्यांचं देशभरात आगमन...

डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.

Updated: Dec 28, 2013, 04:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.
मुंबई : थंडीची चाहुल लागताच शिवडी बंदरावर गर्दी दिसू लागते ती फ्लेमिंगोंची. गुलाबी लांब पाय, पांढराशुभ्र रंग, काळी चोच असा हा देखणा पाहुणा.
पुणे : पुण्यापासून १०० किमी अंतरावर भिगवण (भरतपूर). दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान पिंक ग्रेटर फ्लेमिंगो आणि इतर पक्षी इथं येतात.
संभाजीनगर : इथं येणारा फ्लेमिंगो म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो. लांबलचक बारीक मान, लांब गुलाबी पाय आणि गुलाबी पंख असलेला हा पाहुणा आकर्षक दिसतो.
तामिळनाडू : इथल्या पुलकीत लेकजवळ मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच फ्लेमिंगोंची गर्दी दिसू लागते. तब्बल २५ दिवस ते इथं राहतात.
चेन्नई : इथल्या पाल्लिकरनाई पक्षी अभयारण्यात हे पक्षी येतात, पण इथल्या दलदलीमुळं अनेक पक्षी मृत्युमुखी पडत असल्यानं पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे.
आग्रा : कानपूर इथल्या सूर सरोवर इथं ग्रेटर फ्लेमिंगो, स्पुनबील्स, ग्रेट पेलिकन्स, सैबेरियन करकोचा, सरस करकोचा, डक्स बार हेड गुझ, ग्रे स्ट्रोक असे अनेक पक्षी इथं हजेरी लावतात.
गुजरात : अहमदाबाद इथल्या नल सरोवरात दरवर्षी हिवाळ्यात तब्बल २२ प्रकारचे पक्षी येतात.
बर्स्टड सेंच्युरी: भूजपासून ९२ किमीवर ही सेंच्युरी आहे. फ्लेमिंगोच्या व्यतिरिक्त मॅक्वीन बर्स्टड आणि इतर ४८ प्रकारचे पक्षी इथं बघायला मिळतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.