प्लास्टिक अंड्यांच्या विक्रीबाबतचे सत्य

 आपल्याकडे गेल्या काही दिवसांत प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याची चर्चा आहे. चीनमधून आलेली ही अंडी आरोग्यास हानिकारक असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र राष्ट्रीय अंडी समन्वय समितीनं या बातमीत अजिबात तथ्य नसल्याचा दावा केलाय. 

Updated: Apr 18, 2017, 06:09 PM IST
प्लास्टिक अंड्यांच्या विक्रीबाबतचे सत्य title=

नवी दिल्ली :  आपल्याकडे गेल्या काही दिवसांत प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याची चर्चा आहे. चीनमधून आलेली ही अंडी आरोग्यास हानिकारक असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र राष्ट्रीय अंडी समन्वय समितीनं या बातमीत अजिबात तथ्य नसल्याचा दावा केलाय. 

सोशल मीडियावरील बातम्या ह्या केवळ अफवा असल्याचं त्यांनी प्रात्यक्षिकासह स्पष्ट करून दाखवलं. प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याच्या अफवेमुळं देशातील अंडी व्यवसायावर परिमाण झालाय. अंडी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अंडी खात राहावीत असं आवाहन अंडी समन्वय समितीतर्फे करण्यात आलय. 

यासंदर्भात मागील काही दिवसात एफडीएकडेही तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार अंड्यांची शास्त्रीय तपासणी करण्यात आली असून ती अंडी प्लास्टिकची नसल्याचा निर्वाळा दिलाय.