'शशी थरुर काँग्रेसचे चमचे' अनुपम खेर यांची टीका

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाला आहे. 

Updated: Jan 30, 2016, 06:16 PM IST
'शशी थरुर काँग्रेसचे चमचे' अनुपम खेर यांची टीका title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाला आहे. अनुपम खेर यांनी नुकत्याच एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. हल्ली सार्वजनिक आयुष्यात मी हिंदू आहे हे सांगण्याची भीती वाटते, असं वक्तव्य त्यांनी या मुलाखतीमध्ये केलं होतं.

 
त्यावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी कम ऑन अनुपम, मी हिंदू आहे हे नेहमीच गर्वानं सांगतो, पण मी संघाच्या व्याख्येतला हिंदू नाही, असं ट्विट केलं. थरुर यांच्या ट्विटला मग अनुपम खेर यांनीही प्रत्युत्तर दिलं
कम ऑन शशी, तुम्ही माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढाल, आणि काँग्रेसी चमचासारखं वागालं, असं मला वाटलं नव्हतं, असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे.