VIDEO : जेव्हा उमा भारती अध्यक्षांना सांगतात, 'मी अविवाहीत आहे'

मान्सून सत्राच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत गुरुवारी उमा भारती यांचं नाव उच्चारलं गेल्यानंतर संसदेत हास्याचा एकच कल्लोळ पिकला.

Updated: Aug 13, 2015, 02:41 PM IST
VIDEO : जेव्हा उमा भारती अध्यक्षांना सांगतात, 'मी अविवाहीत आहे'  title=

नवी दिल्ली : मान्सून सत्राच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत गुरुवारी उमा भारती यांचं नाव उच्चारलं गेल्यानंतर संसदेत हास्याचा एकच कल्लोळ पिकला.

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी उमा भारतींना 'श्रीमती' असं संबोधलं... त्यानंतर, आपण आत्तापर्यंत विवाह केलेला नाही आणि भविष्यातही याची शक्यता नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्रींनी मात्र यावर जोरदार आक्षेप घेत आपला विरोध दर्शवला. 

लोकसभा अध्यक्षांनी जल संसाधन, नदी विकास आणि गंगा जीर्णोद्धार मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीचा अहवाल सदनासमोर सादर करण्यासाठी संबंधित मंत्री 'श्रीमती उमा भारती' असं संबोधलं. 

यावर, आपल्या हजर जबाबीपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या उमा भारतींनी लगेचच उभं राहत 'अध्यक्षजी माझा विवाह झालेला नाही' असं म्हणत आक्षेप नोंदवला. मग, महाजन यांनाही आपली चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी 'सॉरी, सॉरी... आय अॅम सॉरी' म्हटलं. 

मग, उमा भारतींनीही 'माझा ना विवाह झालाय आणि आता ना होण्याची शक्याता आहे कारण मी संन्यास स्वीकारलाय... आणि तुम्हीही आता माझा विवाह करू शकणार नाही.. नो व्हॅकॅन्सीचा टॅग लागलाय' असं हसत हसत म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांचा एकच हशा पिकला. 

व्हिडिओ पाहा :-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.