केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ : पाहा काय स्वस्त झाले?

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडताना ग्रामीण भागावर जास्त भर दिला. त्याचवेळी सामन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

PTI | Updated: Feb 29, 2016, 01:25 PM IST
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ : पाहा काय स्वस्त झाले? title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडताना ग्रामीण भागावर जास्त भर दिला. त्याचवेळी सामन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

काय झाले स्वस्त :
- पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा
- घराची किंमत ५० लाख रूपयांपर्यंत असायला हवी.
- पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ३ हजार रुपयांची सूट
- घरभाडे टॅक्सवर सूट
- ५ लाख कमाईवर एचआरएवरील सवलत २४ हजारांवरून ६० हजारांपर्यंत वाढविण्यात आली.
- ३५ लाखांपर्यंतचया होम लोनर ५० हजारांची टॅक्स सूट 

महाग काय झालेय :

- सोन्या चांदीचे दागिने महागणार
- हिऱ्याचे दागिने महागणार
- लक्झरी कार, ब्रँडेड कपडे महागणार, 
- बिडी सोडून इतर तंबाखूजन्य पदार्थ
- सिगरेटही होणार महाग
- दगडी कोळसा
- लेदर बूट, चपलाही महागणार
- दहा लाखापेक्षा अधिक किंमतीच्या गाडया महागल्या.
- सोन्यावरील आयात शुल्क वाढवणार
- डिझेल गाडयांवर अडीच टक्के आणि पेट्रोल गाडयांवर एक टक्का सेस.