उत्तर प्रदेशात 'यादवी' राजकीय 'दंगली'ची 13 जानेवारीला सुनावणी

निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीच्या दोन गटांमधल्या वादात 13 तारखेला सुनावणी ठेवली आहे. पक्षाचं नाव आणि सायकल चिन्हावर मुलायम आणि अखिलेश गटांनी दावा केलाय.

Updated: Jan 10, 2017, 11:53 PM IST
उत्तर प्रदेशात 'यादवी' राजकीय 'दंगली'ची 13 जानेवारीला सुनावणी title=

लखनऊ : निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीच्या दोन गटांमधल्या वादात 13 तारखेला सुनावणी ठेवली आहे. पक्षाचं नाव आणि सायकल चिन्हावर मुलायम आणि अखिलेश गटांनी दावा केलाय.

17 तारखेला उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी हा वाद मिटवण्याचा आयोगाचा मानस आहे. 

दरम्यान, मुलायम सिंह यादव यांनी कालच नमते घेत एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्याच्या हितासाठी समाजवादी पक्षाने एकत्र राहणे योग्य असल्याचे ते म्हणाले. आमच्या दोघांमध्ये कसलाही वाद नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

अखिलेश यादवच पुढील मुख्यमंत्री राहतील, असे मुलायम यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचा अध्यक्ष मीच राहील असेही त्यांनी सांगितले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तिकीट देण्याच्या वादावरुन दोन्ही पिता-पुत्रांमध्ये वादाला सुरूवात झाली. 

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असून देखील आपल्याला विश्वासात घेतले नाही असे म्हणत मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. त्याबरोबरच त्यांनी रामगोपाल यादव यांची देखील पक्षातून हकालपट्टी केली.त्यामुळे वाद अधिकच उफाळला होता. तो अजुनही कायम आहे.