नवी दिल्ली: विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचं दुपारी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून अशोक सिंघल आजारी होते. त्यांच्यावर गुडगावमधल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.
आज वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल २० वर्ष अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख होते.
अयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनातले एक प्रमुख शिलेदार म्हणून अशोक सिंघल यांनी काम केलं. बाबरी मशिदच्या उद्धवस्त केल्याप्रकरणी त्यांचावर खटलाही भरण्यात आला. अशोक सिंघल यांच्या जाण्यानं संघटनेचं मोठं नुकसान झाल्याचं मत विहिंपचे नेते व्यंकटेश आबदेव यांनी व्यक्त केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.