झाला खुलासा ! ...म्हणून मायावती वाचून बोलतात

बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज त्यांच्या लहान भावाला आनंद कुमार यांना पक्षाचा उपाध्यक्ष बनवलं आहे. भाजपविरोधात आक्रमक होत त्यांनी भाजपच्या विरोधा पक्षासोबत हात मिळवणीचे संकेत त्यांनी दिले.

Updated: Apr 14, 2017, 03:15 PM IST
झाला खुलासा ! ...म्हणून मायावती वाचून बोलतात title=

लखनऊ : बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज त्यांच्या लहान भावाला आनंद कुमार यांना पक्षाचा उपाध्यक्ष बनवलं आहे. भाजपविरोधात आक्रमक होत त्यांनी भाजपच्या विरोधा पक्षासोबत हात मिळवणीचे संकेत त्यांनी दिले.

मायावती यांनी त्यांच्यावर जो नेहमी आरोप केला जातो की त्या वाचून बोलतात यावर उत्तर दिलं आहे. मायावती यांनी म्हटलं की, '१९९६ मध्ये त्यांचं गळ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या गळा पूर्णपणे खराब झाला होता. भाषण करतांना जोरात बोलावं लागतं त्यामुळे डॉक्टरांनी असं नाही करण्यास सांगितलं आहे.' त्यामुळे ते वाचून बोलतात असं मायावती यांनी म्हटलं आहे.