पैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले

पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 17, 2014, 02:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सूरत
पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.
३८ वर्षीय महिलेने पोलिसांत पतीविरुद्ध आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात तक्रार नोंदवली आहे. या महिलेचे १० वर्षांपूर्वी सूरतचा रहिवासी असणा-या फतेह करीम सिंध याच्याशी लग्न झाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिंध याने तगड्या रक्कमेच्या मोबदल्यात स्वत:च्या पत्नीला दोन मित्रांनाच विकून टाकले.
अंकलेश्वर येथे हा सौदा झाल्यावर ते त्या महिलेला मुंबईत घेऊन आले आणि एका हॉटेलमध्ये त्यांनी तिच्यावर सलग तीन दिवस (२० ते २३ नोव्हेंबर) बलात्कार केला. ते नराधम तिला परदेशात घेऊन जाणार होते, मात्र त्या महिलेकडे पासपोर्ट नसल्याने त्यांचा बेत रद्द झाला.
मुंबईहून परत जात असताना सदर महिला सुरतमधून त्या नराधमांच्या तावडीतून निसटली आणि तिच्या पालकांच्या घरी परतली. शनिवारी पोलिस स्टेशन गाठून तिने तिचा पती आणि तिच्यावर अत्याचार करणा-या दोघांविरोधात तक्रार नोंदवली. याप्रकरणी आम्ही सिंध याचा तपास घेत असून त्यानंतरच त्याच्या इतर दोन नराधम मित्रांचा छडा लावता येऊ शकेल असे पोलिसांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.